आपली आरोग्य तपासणी सुरळीत पार पडण्यासाठी
🩸 उपाशी व जेवणानंतरची साखर तपासणी 📅 रोज उपलब्ध
🕗 वेळ: सकाळी 7:00 ते 10:30
कृपया खालील सूचना पाळा:
✅ उपाशी नमुना (Fasting):
- ८–१० तास उपाशी राहा (फक्त पाणी चालेल)
- चहा, कॉफी, दूध नको (डॉक्टरांनी सांगितली असल्यास औषधे घेऊ शकता)
- उपाशी नमुना सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत द्यावा
✅ जेवणानंतरचा नमुना (Post-Meal / PP):
- उपाशी नमुन्यानंतर नेहमीचा नाश्ता घ्या
- जेवण सुरू केल्यापासून बरोबर २ तासांनी परत येऊन नमुना द्या
📎 आधीचे रिपोर्ट व डॉक्टरांची चिठ्ठी सोबत आणा
📱 अधिक माहितीसाठी संपर्क: 8080446562 / 9403411612
🧪 लिपिड प्रोफाइल तपासणीसाठी सूचना:
- १२ तास उपाशी राहणे आवश्यक आहे. (फक्त पाणी चालेल)
- रात्रीपासून काहीही खाऊ नका.
- चहा, कॉफी, दूध, औषधे टाळा (डॉक्टरांनी सांगितल्यासच औषधे घ्या).
- सकाळी 7:30 ते 9:30 दरम्यान लॅबमध्ये या.
💧 यूरीन (लघवी) कल्चर नमुन्यासाठी सूचना:
- सकाळचा पहिला लघवीचा मधला भाग (mid-stream) असावा.
- स्वच्छ कंटेनरमध्ये नमुना घ्यावा.
- नमुना देण्यापूर्वी स्वच्छता करावी (महिलांनी पुढचा भाग व पुरुषांनी लिंग स्वच्छ धुवावे).
- कंटेनर बंद झाकणाचे व निर्जंतुक (sterile) असावे.
- नमुना १ तासाच्या आत लॅबमध्ये जमा करावा.
⏳ २४ तास लघवी संकलनासाठी सूचना:
- सकाळी उठल्यावर पहिली लघवी टाकून द्या.
- पुढच्या २४ तासांची सगळी लघवी एकाच कंटेनरमध्ये जमा करा.
- शेवटची लघवी दुसऱ्या दिवशी त्या वेळेला घ्या ज्या वेळेला सुरूवात केली होती.
- कंटेनर fridge मध्ये ठेवा.
- संपूर्ण नमुना लॅबमध्ये सादर करा.
🧬 वीर्य नमुना (Semen Collection) साठी सूचना:
- हस्तमैथुन करून स्वच्छ व निर्जंतुक कंटेनरमध्ये नमुना घ्या.
- नमुना ताजाच हवा — ३० मिनिटांच्या आत लॅबमध्ये द्या.
- 3–5 दिवस abstinence (संभोग / वीर्यस्खलन टाळा)
- ल्युब्रीकंट, कंडोम किंवा इतर वस्तू वापरू नका.
- स्वच्छतेची काळजी घ्या.
😮💨 कफ नमुना (Sputum Collection) साठी सूचना:
- सकाळचा पहिला कफ हवा.
- तोंड स्वच्छ पाण्याने धुवा (ब्रश किंवा माउथवॉश नको).
- छातीतून आलेला खरा कफ कंटेनरमध्ये थुका.
- कंटेनर बंद करून लगेच लॅबमध्ये द्या.
- तीन दिवस सलग नमुने दिल्यास अचूक निकाल मिळतो.